ऑनलाईन टीम / कोलकत्ता
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीनंतर ही राजकीय उलाथापालथ थांबलेली नाही. भाजपचे खासदार मुकुल रॉय यांनी घरवापसी केली आहे..त्यामूळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला खिंडार पडले आहे. तसेच तृणमूल काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक दिग्गज नेते परत तृणमूलच्या वाटेवर आहेत. याच राजकीय उलथा – पालथीच्या पार्श्वभूमीवर आता प.बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ”भाजप म्हणजे फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो”असे म्हणत बंगालच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे.
ममताजींशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं लाऊडस्पीकरवरुन म्हणत फेरी काढली आहे. प.बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यात लाभपूर, बोलपूर, सैथिया या बरोबर हुगली जिल्ह्यातील धनियाकली या गावामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. मात्र, हा माफिनामा म्हणजे तृणमूल काँग्रेसची चाल आहे. असे म्हणत भाजपने या माफीनाम्याचे खंडण केले आहे.तसेच ममता बॅनर्जीं यांच्या दबावापोटी हा माफीनामा दिला असल्याचे म्हटले आहे.
मुकूल मंडल नावच्या भाजपच्या कार्यकर्त्याने सांगितलं की,आम्ही भाजपाला ओळखायला चुकलो.आम्हाला तृणमूलमध्ये परत जायचं आहे.तर सैथियामध्ये भाजपाचे ३०० कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले आहेत.यावरुन बंगालचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या नंतर ही तृणमूलमध्ये प्रवेश होत राहील्यास भाजप आणि तृणमूल काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहणार आहेत.








