ऑनलाईन टीम / चंदिगड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप आणि पंजाबमधील शेतकरी यांच्यातील नाराजी शेतकरी आंदोलनच्या निमित्ताने सूरु झाली. मात्र ती अजून ही संपल्याचे दिसत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना काही वेळ त्यांना आपला दौरा थांबवावा लागला असल्याचं सांगितले जात असून यासाठी केवळ पंजाब राज्य शासनाकडून सुरक्षेतील गंभीर त्रुटी राहील्याने पंतप्रधानांना दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले असल्याचे नमुद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ आहे. या घटनेवरुन पंतप्रधान मोदी प्रक्षेकांविना सभा घ्यावी लागत असल्याचा सूर आळवला आहे.
तर याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला पंजाबमध्ये अडवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली यावरुन पंजाबच्या शेतकरी नेत्यांनी भाजप नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र असल्याचं म्हटले आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर पंजाबमधील सुमारे १६ जिल्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या या शेतकरी संघटनेच्या नेते बीकेयू क्रांतीकारीचे सुरजीत सिंग फूल यांनी या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मोदींचा ताफा अडवून भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र असल्याचं सुरजीत सिंग फूल यांनी म्हटलंय.
शेतीविषयक कायदे रद्द केल्यानंतर जवळपास सर्व शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन संपवले असताना, पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना अशी ओळख असणाऱ्या भारतीय किसान युनियने (क्रांतीकारी) (बीकेयू क्रांतीकारी) अजूनही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु ठेवले आहे.