आ.गाडगीळ यांच्याहस्ते रस्तेकामाचे उदघाटन
प्रतिनिधी / कुपवाड
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात खऱ्या अर्थाने विकासकामाला गती मिळाली आहे. भाजपाच्या माध्यमातून आणि स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे मुबलक निधी मिळाल्याने कुपवाडच्या प्रभाग आठमध्ये विकासकामे होऊ लागली आहेत, असे प्रतिपादन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे बोलताना केले.
भाजपाच्या नगरसेविका कल्पना कोळेकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्रभाग आठमधील विद्यानगर गल्ली नंबर दोनमधील हॉटमिक्स रस्ता डांबरीकामाचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वागत करताना नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी या कामासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून विशेष प्रयत्न करुन २० लाखाचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले. यासाठी भाजपचे नेते शेखर झ्नामदार यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. बऱ्याच वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम सुरु झाल्याने भागातील नागरिकांनी नगरसेविका कोळेकर यांचे कौतुक केले. यावेळी भागातील नागरिक उपस्थित होते.








