प्रतिनिधी/ वडूज
देशातील भारतीय जनता पक्ष आता कुठेही हारू शकत नाही. एका कार्यकर्त्यानी बूथ व सात घरे सांभाळून ठेवली तर 2024 साली भारतीय जनता पक्ष एक नंबरचा असेल. तर भाजपामध्ये मंत्र्यापेक्षा जिल्हाध्यक्षाना मोठा सन्मान असतो, असे प्रतिपादन भाजपचे नुतन जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वडूज येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शहराध्यक्ष प्रदिप शेटे, जयसिंगराव जाधव, रामभाऊ देवकर-पाटील, सोमनाथ भोसले, अनिल माळी, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, अमोल गोडसे, वचन शहा, डॉ. प्रशांत गोडसे, शशिकांत पाटोळे, सोमनाथ जाधव, संजय काळे, चंद्रकांत काळे, नगरसेविका रेखा माळी, रेश्मा बनसोडे, किशोरी पाटील, निलेशकाका गोडसे, गणेश गोडसे, बनाजी पाटोळे, कृणाल गडांकुश, काका बनसोडे, निलेश कर्पे, विक्रम रोमन, प्रल्हाद निकम, सुनील माळी, आकाश जाधव मान्यवर उपस्थित होते.
आ. गोरे पुढे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आपण सलग तीनवेळा निवडून आलो आहोत. जिल्हाध्यक्ष पद देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मोठा सन्मान केला. याबद्दल त्यांना व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. यापुढच्या काळात ताकदीने काम करणारे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनापासून ताकद देणार आहे. भविष्यात सातारा जिह्यातील एक नंबरचा भाजप पक्ष करणार आहे. राज्य सरकार अपशकुनी आहे. शप्पथ घेतल्यानंतर कोरोना आला, एस सी, ओबीसी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण गेले. एसटीचा संप सुरु असल्याचे सांगितले.
यानंतर तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष विकल्प शहा, ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे, डॉ. वैभव माने, ऍड. प्रशांत पाटील यांची भाषणे झाली.
सत्कार सोहळे याच्याशी माझे जमत नाही पण, आमदारपेक्षा जास्त सत्कार भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून होत असल्याने सर्वानाच आनंद आहे. पण, अनेकांना चिंता लागली आहे. पाच वर्षात खूप बदल घडवून आणला. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कामांचे अडीच वर्षात या राज्य सरकार अद्घाटन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. वर्षात सत्तर टक्के लोकांना दहा हजार रुपये मिळतात. राष्ट्रीय महामार्गाची कामे केली. अडीच वर्षात ज्यांनी अंकुश ठेवण्याच्या काम दिले तेच भ्रष्टाचारी निघाले. सर्व भ्रष्टाचारी अस्वस्थ झाले असल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.








