प्रतिनिधी/शिरोळ
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख (भाऊ ) यांच्या प्रचारार्थ शिरोळ तालुक्यात युवा संवाद व पदवीधर मतदार गाठीभेटी संपर्क दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी शिरोळ तालुक्यातील विविध प्रमुख संघटना पदाधिकारी व मतदारांशी भेटून मतदारांचे प्रश्न व निवडणूक भूमिका याविषयी चर्चा केली.
दरम्यान , शिरोळ येथे यादव निवासस्थानी भाजपा पदवीधर उमेदवार देशमुख यांचा जि प सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने, भाजपाचे ज्येष्ठ अनिलकुमार यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी पदवीधर मतदारसंघातील भाजपा उमेदवार देशमुख यांचा परिचय करून दिला.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते अनिलराव यादव म्हणाले, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांना कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यात सर्वाधिक एक नंबरची मते देऊन प्रचंड मतानी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
भाजपा उमेदवार संग्रामसिंह देशमुख म्हणाले, सामान्य माणसाला बळ देण्यासाठी देशमुख घराण्याने आयुष्य खर्च केले आहे. प्रामाणिक व विश्वासावर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना जनतेने भरभरून साथ दिली. पदवीधर व अन्य प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक वेळेची संधी म्हणून मला निवडून द्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ नीता माने, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, पोपट पुजारी, मुकुंद पुजारी, दानर्लिंग चौगुले, महावीर तकडे, सुरगोंडा पाटील, अनुप मधाळे, पंकज गुरव, संतोष जाधव, अशोक पाटील, अशिया गवंडी, रवी शहापुरे , उर्मिला सूर्यवंशी , शिक्षक नेते रविकुमार पाटील, उर्दू शाळा शिक्षक नेते मोझम चौगुले, रागिनी शर्मा , नगरसेवक पंडित काळे, डॉ अरविंद माने , गजानन संकपाळ , विजय आरगे , श्रीवर्धन देशमुख, इमरान आतार , सौ विदुला यादव, सनाउल्ला पठाण, सपना कांबळे , संजय पाटील, अश्विनी नवघरे यांच्यासह विविध संघटना पदाधिकारी व पदवीधर ,शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक भगवान कोळी यांनी आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









