प्रतिनिधी / उस्मानाबाद
राज्यातील जनतेच्या मनात या आघाडी सरकार विरोधात प्रचंड राग असून तो राग मतदार मतदानाच्या माध्यमातून व्यक्त होणार असल्याने भाजपाचे उमेदवार विजय होतील, असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा नेते गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील, सुधीर पाटील,ॲड. व्यंकटराव गुंड, अॅड. नितीन भोसले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, एक वर्षातील आघाडी सरकारच्या कारभारास कंटाळली असून भाजप सरकारचा कारभार चांगला होता, अशी चर्चा करू लागली आहे.
या सरकारने मराठवाडा विकासासाठी आमच्या सरकारने वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली होती. मात्र या सरकारने या योजनेस स्थगिती देत पोखरा योजना, जलयुक्त योजनेला निधी न देण्याचा सरकारचा कार्यक्रम सुरू झाल्याची टीका त्यांनी केली. सरकार जनतेच्या हिताची कामे करीत नसल्याने नाराजी मोठ्या प्रमाणात पसरली असून ती नाराजी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करुन विजयाची माळ भाजपा उमेदवारांच्याच गळ्यातच घालणार आहेत असे त्यांनी यावेळी नमूद केले.
Previous Articleजागा वाढवून रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करा; खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
Next Article शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीची मतदान केंद्राची तयारी









