ऑनलाइन टीम / मुंबई :
महाविकास आघाडीच्या ताकदीमुळे पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे.
मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 141 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेनं जागा राखली आहे. या प्रभागातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत. विठ्ठल लोकरे यांना 4427 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार दिनेश पांचाळ यांना 3042 मते मिळाली.
नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश पवार यांनी विजय मिळवला. पवार यांनी 4913 मते मिळाली तर, भाजपच्या पराभूत उमेदवार विशाखा शिरसाठ यांना 1525 मते मिळाली.









