मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटण्यापेक्षा राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असेच चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते राज्यापाल यांची भेट घेणार होते मात्र राज्यपालांनी भेट नाकारली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाल्यास भाजपमध्ये मोठी फूट पडेल अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. यामुळे आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून राजभवनाकडे वेळ मागण्यात आली होती मात्र वेळ दिली नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपालांच्या भेटीची वेळ घेण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र राजभवानाकडून कळवतो असे सांगण्यात आलं होते परंतु काही सांगितले नाही यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातून मिलिंद नार्वेकर यांना राजभवनावर पाठवण्यात आलं असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राजभवन हे भाजपचे कार्यालय आहे. राज्यपालांवर भाजपचा मोठा दबाव आहे. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपला या १२ जागांवर त्यांचे लोकं बसवायचे आहेत. यामुळे राज्यापालांच्या माध्यमातून खेळ करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








