मुंबई/प्रतिनिधी
महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. परंतु नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजप नेते आक्रमक होत सत्ताधारी ठाकरे सरकारवत टीका करत आहेत. राणेंच्या अटक सत्रानंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नारायण राणे यांचे नाव ना घेतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
राऊत यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यात सुरु असणाऱ्या प्रकरणावरून हा टोला लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे. आम्ही २५ वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला