मुंबई/प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या कारवाईचे पडसाद आज विधानसभेत आणि सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. तसेच भाजपने आज विधानसभेच्या पायरीवर बसून अभिरुप विधानसभा भरवली. परंतु विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु असलेली प्रतिवीधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. यांनतर पत्रकार कक्षात भाजपानं प्रतिविधानसभा भरवली. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. या टीके नंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी भाजपजवळ बोलायला काही ठोस नसल्याने केवळ स्टंट सुरु आहे असे ते म्हणाले.
दरतम्यान, आमदार रोहित पवार यांनी यासर्व गोंधळावरुन भाजपावर जोरदार टीका करत भाजपाला फक्त राजकारण करायचे आहे असे म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत, “सर्वोच्च सभागृहाकडं पाठ फिरवायची, सरकार व मा.अध्यक्षांनी विनंती करूनही कामकाजात भाग न घेता सभागृहाबाहेर गोंधळ घालून खोटेनाटे आरोप करायचे,यावरून भाजपाला फक्त राजकारण करायचं,हे सिद्ध होतं! OBC, मराठा आरक्षण व कृषी कायद्यांवर बोलायला भाजपाजवळ काहीही ठोस नसल्याने हा केवळ स्टंट सुरू आहे!,” असे म्हटले आहे.