गोव्यातील उमेदवारांच्या नावांवर होणार शिक्कामोर्तब
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बेठक आज नवी दिल्ली येथे होत असून यात गोव्यातील भाजप उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल.पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि महासचिव सतिश धोंड हे दिल्लीला पोहोचले आहेत. आज दुपारी सर्व नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. गोव्यातील निवडणुकीसंदर्भात उहापोह करणार आहेत. सायंकाळी चार वाजता भाजप संसदीय मंडळाची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे कोविडबाधित आहेत. त्यामुळे व्हर्च्युअल पद्धतीने ही बैठक घेतली जाणार आहे.
दरम्यान, कुंभारजुवे मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी रोहन हरमलकर यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त आहे.









