ऑनलाईन टीम/तरुण भारत /प्रतिनिधी
देशभरात 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. त्यासाठी 30 ऑक्टोबरला मतदान, तर 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एकूण 15 जागांवर विजय मिळवला. मंगळवारी 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांसमोर अडचणी निर्माण करू शकतात. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर (Jai Ram Thakur Chief Minister of Himachal Pradesh) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्माई ? (Basavaraj Bommai Chief minister of Karnataka) यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण कर्नाटकमध्ये भाजपला एका जागेवर विजय मिळविता आला. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने ३ विधानसभा आणि १ लोकसभेची जागा गमावली आहे. काही दिवसापूर्वी भाजपने दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री बदलले होते.
दरम्यन, भाजपनं गेल्या सहा महिन्यांत चार मुख्यमंत्री बदललेत. यात गुजरातमध्ये विजय रुपाणी, कर्नाटकात बीएस येडियुरप्पा, उत्तराखंडात त्रिवेंद्र सिंह रावत आणि तीरथ सिंह रावत यांचा समावेश आहे. मात्र या पोटनिवडणुकीत हिमाचलमध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय. जिथं विरोधी काँग्रेसनं त्यांच्या खात्यात तीन विधानसभा आणि एक लोकसभेची जागा जिंकलीय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हा पराभव स्वीकारलाय. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं ‘भावनिक कार्ड’ खेळत हा विजय संपादन केल्याचा आरोप भाजपनं केलाय.