बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे पुढील वर्षी मार्चपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तहकूब करण्याची मागणी दोन राज्यमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये ग्रामविकास व पंचायत राजमंत्री के.एस. ईश्वरप्पा आणि आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका तहकूब करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. राज्यात निवडणुका घेण्यास अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलणे चांगले. यावर्षी अखेरीस निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग सज्ज असल्याचे विधान राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच केले. दरम्यान मंत्री ईश्वरप्पा यांनी या निवेदनाच्या संदर्भात विधान केले आहे. यांचे हे विधान या निवेदनाच्या संदर्भात आले आहे.
राज्यातील कोणताही पक्ष निवडणुकांच्या बाजूने नाही, असे ईश्वरप्पा म्हणाले. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्यात अद्याप शाळा सुरु नाहीत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे घातक ठरू शकते. केवळ भाजपच नाही तर कॉंग्रेस आणि जनता दल-एस देखील निवडणुका घेण्याच्या बाजूने नाहीत. जिल्हा प्रशासनही निवडणुकीसाठी तयार नाही. ग्रामीण भागातील मतदारांनाही निवडणुका नको आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या निवडणुकीवर आपली भूमिका मांडली आहे.
या संदर्भात न्यायपालिका आणि आयोगाचा निर्णय अंतिम असेल, असे ते म्हणाले. राज्य सरकार लवकरच निवडणूक आयोगाला निवेदन देऊन निवडणूक पुढे ढकलणार आहे असे म्हंटले आहे.









