पेडणे ( प्रतिनिधी )
देशात भारतीय जनता पार्टी ही नंबर वन पार्टी आहे , देशहित पाहणारी पार्टी आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारी पार्टी म्हणून ती नावारूपास आली . त्याच पार्टी सोबत आम्ही राहूया आणि जिल्हा पंचायतीचे दोन्ही उमेदवार निवडून आणून माझे व भाजप पक्षाचे मुख्यमंञी डा?.प्रमोद सावंत यांचे हात बळकट करुया असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नागझर येथे केले.
भाजप जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंञी बोलत होते .
ड़ आजीवन भाजप पक्षातच राहणार
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना 1999 साली या मतदारसंघात प्रवेश केला . त्यावेळी विकासाचे नाव नव्हते , सत्येशिवाय विकास करता येत नाही याची जाणीव ठेवून काँग्रेस भाजपा ,मगो आणि आता भाजपात प्रवेश केला , सत्तेत राहून विकास केला असे सांगून , माञ यापुढे आपण आजीवन भाजपातच राहणार अशी ग्वाही दिली .
ड़ तोरसे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या उमेदवाराच्या पाठिंब्यासाठी मंगळवार 24 रोजी नाना शेट सभागृहात आयोजित केलेल्या सभेला यावेळी व्यासपीठावर भाजपा गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे , पेडणे भाजप गट अध्यक्ष तुळसीदास गावस , तोरसे भाजाप उमेदवार सीमा खडपे , डा?.वासुदेव देशप्रभू, धारगळ भाजप उमेदवार मनोहर धारगळकर ,सरपंच संतोष मळीक ,अशोक सावळ ,सोनाली इब्रामपूरकर ,पल्लवी राऊळ ,उषा नागवेकर ,नागेश गोसावी ,रामा सावळ भूषण नाईक ,संजय तुळस्कर ,विश्वनाथ तिरोडकर ,पांडुरंग परब , आंतोंन रा?ड्रिग्स आदी उपस्थित होते .
ड़ उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना भाजपाला मजबूत करण्यासाठी दोन्ही उमेदवारांना विजयी करणे म्हणजे बाबूंचे हात बळकट होतील ,विकासाला हातभार लावणाऱया भाजपला सत्ता देण्याचे आवाहन करत
मतदार संघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठं मोठे प्रकल्प येतात त्यात स्थानिकानाच रोजगार मिळवून देणार असे आश्वासन दिले. याही पुढे भाजपाचेच सरकार येणार आणि परत मुख्यमंत्री डॉक्टर सावंतच असणार असा विश्वास व्यक्त करून ,विरोधकांकडे कोणतेच कार्यक्रम नाही ते काहीही करू शकत नाही ,त्यासाठी भाजपला उर्वरीत प्रकल्पाला गती देण्यासाठी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाला सत्ता द्या असे आवाहन केले.
भाजपचे सरकार हे लोकशाहीचे सरकारः तुळसीदास गावस
पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस म्हणाले , केवळ भाजच पक्षाचे सरकार हे लोकशाहीचे राज्य आणू शकतात. सत्तेशीवाय विकास करता येत नाही म्हणून बाबू आजगावकर यांनी पक्ष बदलले , सत्ता मिळवली आणि विकास केला . देशात व राज्यात भाजप सत्तेत आहेत त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन तुळशीदास गावस यांनी केले .
ड़ जिल्हा पंचायत निवडणुका 15 डिसेंबर पूर्वी होणारः सदानंद तानावडे
भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले कि जिल्हा पंचायत निवडणुका ह्या 15 डिसेंबर पूर्वी घेण्यात येणार आहे. कोविडमुळे 22 मार्चला होणाऱया निवाडणुका लांबणीवर पडल्या. आता परत पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात आमचेच उमेदवार निवडून,येणार असा विश्वास व्यक्त केला.
2022 च्या निवडणुकीतच बाबू आजगावकर हेच भाजपचे उमेदवार असतील : सदानंद शेट तानावाडे
2022 च्या निवडणुकीनंतर गोव्यात भाजपचेच सरकार असणार आणि बाबू आजगावकर हेच पेडणे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील व ते पुढेही मंत्री असतील असे सांगून बाबू विषयी कोणी अफवा पसरू नये बाबू हेच राज्याचे कायमस्वरुपी उपमुख्यमंत्री असतील असे सांगून निवडूणुका आल्या की पावसातील अळमी उगवतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले करत तोरसे मतदारासंघाच्या उमेदावार सीमा खडपे व धारगळ मतदारासंघाचे उमेदवार मनोहर धारगळकर या दोन्हीही भाजापच्या उमेदवारांना विजयी करुन बाबू आजगावकर यांचे हात बळकट करत पक्ष मजबूत करा असे आवाहन सदानंद शेट तानावाडे यांनी केले.
ड़ कोळसा काँग्रेसने आणलाः तानावाडे
भाजपाने कोळसा आळला नाही तो कोळसा काँग्रेस पक्षाने आणल्याचे दावा करून भाजप जनतेचे हित पाहू शकतो .भाजपा कोरोना काळात लोकांमध्ये होती ,मदत करत होती .मात्र काँग्रेस नेते आमदार केवळ घरात बसून पत्रके काढत होते आणखी त्याने काहीही केले नसाल्याचे तानावडे म्हणाले .
विरोधकांनी मतदार संघात काय केले ते त्यांना ज्यावेळी मते मागायला येतील तेव्हा विचारा . असे तानावडे यांनी सांगून भाजपा निवडणूक लढवतात ते जिंकण्यासाठी असते असे तानावडे म्हणाले .
यावेळी नागेश गोसावी ,संतोष मळिक ,उषा नागवेकर ,सीमा खडपे ,डॉक्टर वासुदेव देशप्रभु आदींची भाषणे झाली. सूञसंचालन पांडुरंग परब यांनी केले. संजय तुळस्कर यांनी आभार मानले. ड़ सभेला मोठय़ा प्रमाणात भाजप कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.









