ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठी उद्योजक अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली, यावर भाजपचे लोक बोलत नाहीत. अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळं आत्महत्या लागली त्याच्या समर्थनार्थ भाजपचे लोक बोलत होते. अन्वय नाईक यांना किरीट सोमय्यांनी दोन वेळा धमकी दिल्याची माहिती माझ्याकडे आहे. अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, अशी धमकी सोमय्यांनी दिली. त्यानंतरच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा तोफ डागली. ते म्हणाले, अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले. तसेच या प्रकरणात आरोप झालेल्या अर्णब गोस्वामींकडे पैसे मागू नये, तसेच त्यांना बिल पाठवू नये, यासाठी किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईकला दोन वेळा धमक्या दिल्या होत्या. अन्वय नाईकला ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली, त्याच्या समर्थनार्थ भाजपचे लोक कोर्टबाजी आणि पत्रकबाजी करत होते. कारण हे लोक अर्णब गोस्वामीला वाचवत होते.
आता किरीट सोमय्या इकडे-तिकडे बंगले, जमिनी शोधत फिरत आहेत. बंगले त्यांच्या स्वप्नात येतात. कुठे आहेत ते बंगले दाखवा. बंगले अदृश्य झाले आहेत. यांच्या स्वतःच्या मालमत्ता असल्याने ते इतरांवर आरोप करत सुटले आहेत. किरीट सोमय्या चोर, लफंगे आहेत. लवकरच बाप-बेटे तुरुंगात जातील, असेही राऊत यांनी म्हटले आहे.








