बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपा सरकारचा कारभार कसा चालला आहे? हे त्याच पक्षाचे नेते बसवगौडा पाटील यत्नाळ यांनी याबाबत त्यांनी स्पष्ट केले आहे. यत्नाळ यांनी आपल्याच पक्षातील चाललेल्या कारभाराविषयी आरसा दाखविला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या कारभाराविषयी काही भाष्य करण्याची गरज नाही. सीरा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हे वक्तव्य केलं. तसेच शिवकुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा सरकार समाजातील कोणत्याही घटकाला न्याय देण्यात अपयशी ठरली असल्याचे ते म्हणाले.
शिवकुमार यांनी राज्यात असं असंवेदनशील सरकार पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. या सरकारचे अनेक मंत्री कोरोना साथीसारख्या परिस्थितीतही भ्रष्टाचारामध्ये व्यस्त आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात या सरकारने विरोधकांच्या एका आरोपाला प्रत्युत्तर दिल नाही. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात पु परिस्थिती आहे. यासाठी सरकरकडे कोणतीही स्पष्ट योजना नाही. पुरबाधित जिल्ह्यातील रहिवाशांना देवावर विश्वास ठेवून संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारामध्ये व्यस्त आहे,अशी टीका शिवकुमार यांनी केली आहे.









