ऑनलाईन टीम / तरुण भारत
महाविकास आघाडीतील काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. असं भाजपचे अऩेक नेते वेगवेगळ्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर करत असल्याचं संपुर्ण महाराष्ट्राने ऐकलं आहे. सद्या मात्र यावर महाविकास आघाडीतील नेत्याने देखील भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील दानवेंवर निशाणा साधला आहे. शिवाय, एमआयएमकडून महाविकास आघाडीला देण्यात आलेल्या ऑफरबाबत देखील सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रावसाहेब दानवे बरोबर बोलले त्यांचे २५ आमदार हे गडबड करू लागेल, खरखर करू लागले ते भाजपाचे २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. धूळवड म्हणून भजे वैगरे खाऊन काहीतरी बोलण्याचा त्यांनी प्रयोग केला असेल, तर मला माहीत नाही. परंतु त्यांचे २५ आमदार फुटणार आहेत. तरी त्यांनी त्यांचे २५ आमदार सुरक्षित ठेवावेत, याबाबत शाश्वती त्यांनी दिली तरी धन्यवाद. भाजपाचे २५ आमदार महाविकास आघाडीत सहभागी होणार आहेत. हा धोका निर्माण होऊ नये म्हणून उलटा चोर कोतवाल को डाटे.” असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. यावर बोलताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सांगितले की, “या शिवसेनेत पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो निर्णय अंतिम असतो. असे ही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे भाजपसोबत महाविकास आघाडीने वक्तव्य करण्यासाठी अॅक्टिव मोड घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.