प्रतिनिधी /पणजी
कळंगुटमधील भाजपचे माजी कार्यकर्ते गुरुदास शिरोडकर यांनी समर्थकांसह भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. यावेळी कळंगूट मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार विजयी होणार, असा दावाही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यावेळी उपस्थित होते. त्यांनी गुरुदास शिरोडकर यांच्यासह सर्वांना भाजपचे शेले गळय़ात घालून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. राज्य, देश प्रथम ते भाजपात व पत्नी प्रथम ते काँग्रेसमध्ये, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केली. तर मतदार लोबोंना त्यांची जागा निश्चित दाखवतील, असे प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले.









