फलटण / प्रतिनिधी :
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण शहर भाजपच्या वतीने शहरातील उमाजी नाईक चौक, रविवार पेठ नाना पाटील चौक, महापुरा पेठ तसेच सोमवार पेठ येथील प्रमुख रस्त्यावरील खड्डयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
फलटण शहरातील सर्व रस्ते भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खराब झाले असून, 72 कोटींच्या भुयारी गटार योजनेला बेकायदेशीरपणे 118 कोटी देऊन सुद्धा शहरातील रस्ते होत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका यावेळी नगरसेवक अनुप शहा यांनी केली.
यावेळी शहराध्यक्ष अमोल सस्ते, गटनेते अशोक जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, मेहबूब मेटकरी सामाजिक कार्यकर्ते नितेश खराडे निलेश आदी उपस्थित होते.










