ज्येष्ठ भजनी कलाकार मोहनदास पोळे यांचे प्रतिपादन
पेडणे / (प्रतिनिधी )
गोव्यातील भजनी कला आणि नाटय़ कला टिकवून ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेत आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करत गोव्याच्या विविध भागात शेकोडो शिष्य तयार करुन भजन कला जोपासण्याचे महान कार्य स्वर्गीय पंडित वामनराव पिळगांवकर आणि पं. परशुराम कामुलकर यांनी केले आहे असे प्रतिपादन ज्ये÷ भजनी कलाकार मोहनदास पोळे यांनी केले. संगीत समेलनाचे उद्घाटन केल्यानंतर उद्घाटक या नात्याने मोहनदास पोळे नागझर येथे बोलत होते.
पं. वामनराव पिळगांवकर शिष्य व हितचिंतक परिवार गोवा यांच्या तर्फे आयोजित स्व.पंडित परशुराम कामलुकर व स्व. पंडित वामानराव पिळगांवकर यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत संमेलनाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रवीण आर्लेकर , खास निमंञीत पाहुणे प्रताप भेंडाळकर , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, आयोजन समितीचे अध्यक्ष महाबळेश्वर च्यारी, गोरख मांदेकर, इशांत पिळगांवकर , गणेश पार्सेकर आदी उपस्थित होते.
गोव्याच्या खेडोपाडय़ात भजनी कला आणि संगीत नाटय़ कलाकार घडविलेः मोहनदास पोळे
मोहनदास पोळे पुढे म्हणाले की, गोव्यात जी भजनी कला आणि संगीत नाटय़ कला टिकली ती टिकविण्यासाठी गोव्याच्या विविध ग्रामीण भागात जाऊन पूर्वी तळमळीने आपली भुमिका निभावताना संगीत नाटकाला उभारणी देण्याचे कार्य केले. भजन क्षेत्रातील शिष्य त्यांना दादा म्हणत असे.ते खरोखरच भजन कलेले दादा होते. कुठेही मोठेपणा न मिरविता मितभाषी म्हणूनच शेवटपर्यंत त्यांनी आपल्या शिष्या?कडून कौतुकाचे शब्द घेतले. गोव्यात जे नामांकित असे शिष्य संगीत आणि भजन क्षेत्रात आहेत ते पं.वामनराव पिळगांवकर यांनी तयार केल्याचे मोहनदास पोळे म्हणाले.
ड़ भजन कला ही एक ईश्वरी कला आहेः प्रविण आर्लेकर
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रविण आर्लेकर म्हणाले, भजन कला आणि संगीत ही एक ईश्वरी कला आहे. या कलेच्या माध्यमातून ईश्वरी भक्तीत लीन होता येते.मानसिक आनंद त्याच बरोबर सामाजिक एकोपा निर्माण या कलेच्या माध्यमातून होत असतो. पंडित वामनराव पिळगांवकर आणि पंडित परशुराम कामुलकर यांनी गोव्यातअनेक शिष्य तयार करुन ही कला पुढील पिढी पर्यंत जावी यासाठी मोठे योगदान दिले.त्यामुळेच आज अशी संगीत संमेलने त्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी आयोजित केली जातात असे सांगून अशा कार्यक्रमांना आपले नेहमीच सहकार्य असेल असे प्रविण आर्लेकर म्हणाले.
ड़ यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रताप भेंडाळकर म्हणाले पंडित वामनराव पिळगावकर व पंडित परशुराम कामुलकर यांचे संगीत आणि भजन क्षेञात मोठे योगदान आहे. आमच्या नागझर गावात अशा थोर कलाकारांच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या या संमेलनातून आमच्या गावाचे लौकिक होणार असून आयोजकांनी हे संमेलन नागझर येथे आयोजित केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.
ड़ उद्घाटन सञाचे सूञसंचालन आणि पाहुण्यांची ओळख प्रशांत धारगळकर यांनी केली. मान्यवरांना पुष्पगुच्छ संतोष चोडणकर, पांडुरंग शिरोडकर , प्रसाद पार्सेकर आदीनी दिले, तर आभार गणेश पार्सेकर यांनी मानले.
ड़ यानंतर पंडित वामनराव पिळगावकर आणि पंडित परशुराम कामुलकर यांच्या शंभर शिष्या?नी अभंग , भावगीते सादर केली.
सुरुवातीला गणेश पार्सेकर, पांडुरंग राऊळ, सुनिल दिवकर, महाबळेश्वर च्यारी गोविंद मराठे , प्रल्हाद गावस , विठ्ठल शारोडकर व मोहनदास पोळे यांनी नांदीने संगीत सएमेलनाची सुरुवात केली तसेच अभंग आणि भावगीते सादर करुन संगीत संमेलनाला उंची प्राप्त करुन दिली.
यावेळी संगीत साथ विशांत पिळगावकर, शिवानंद दाभोलाकर, निशिकांत कळंगुटकर, प्रसाद कळंगुटकर, राजू कोलवाळकर व चंदन शेटय़? यांनी केली.
ड़ प्रेमानंद शेट वेलिंगकर , प्रकाश काकतकर, एकनाथा गोवेकर, सुर्यकांत तेमकर, प्रेमनाथा पाळणी, सुरेश केरकर, प्रकाश नाईक, संदिप कामुलकर , विदेश बाणावलीकर, सरोज दिवकर , वासुदेव परब, विष्णू परब, चेतन हळर्णकर, प्रेमानंद शेट वेलिंगकर आदीनी आपली कला सादर केली.









