विश्वनाथ मोरे / कोल्हापूर
भाऊबंदकीतील वाद संपणार का? समाजामध्ये सर्वच ठिकाणी भावकीतील वाद या कारणामुळे दुफळी निर्माण होत आहे. करवीर तालुक्यातील आरडेवाडी येथे भाऊबंदकी वादातून एका युवकाची हत्या झाली. यामध्ये कुटुंबातील कर्तेपुरुष आज अटकेत आहेत. दोन्ही भावकीतील जवळपास 50 लोकांची दोन कुटुंबे. पण डोंगर भागातील शुल्लक गवताच्या पेंडीवरून वाद निर्माण झाला व त्याचा विपर्यास मोठ्या भांडणात झाला. यामध्ये एका युवकास आपला जीव गमवावा लागला.
या घटनेमधून कर्त्यापुरुषांना न्यायालयात चकरा माराव्या लागणार !. भावकीतील असणारे हे वितुष्ट एखाद्या झाडाला पाणी घातल्यासारखे असेच वाढत राहणार का? या प्रश्नाचे उत्तर अनभिज्ञ राहणार.
आज समाजामध्ये प्रत्येक गावात असा भावकीतील वाद आहे. खुपिरे गावामध्ये काही महिन्यांपूर्वी मामा-भाचे पाटील -मांगोरे यांचेमधील दारातील शिल्लक जागेवरून झालेला वाद व आरडेवाडी येथील वाकरेकर कुटुंबातील गवताच्या पेंडी वरून झालेला वाद. या दोन्ही घटना जवळपास सारख्याच आहेत. वरील घटनेतून प्रत्येक गावांमध्ये एकमेकांचे पै पाहुणे आहेत. स्थानिक नेत्यांनी आणि नातलगांनी एकत्र येउन हा प्रश्न मिटला असता व एक जीव वाचलाअसता. दोन्ही कुटुंबामध्ये एकोपा राहिला असता.पण आज एकमेकांमध्ये होणारे मतभेद वाढत चालले आहेत. ते मिटवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही हे कटू सत्य आहे. आज कोरोना संसर्गजन्य आजाराने आपला जीव वाचणे महत्त्वाचे आहे हे शिकवले आहे. पण या काळातच अशा प्रकारचे होणारे भावकीतील वाद म्हणजेच मनुष्याचा अहंकारच .. स्वतःचा नाश करून घेतो असे म्हटले तर वावगे होणार नाही.









