तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी! (भाग 2)
या लेखमालेला एक महा उपाय या नजरेनेच बघावे! लेखाच्या सुऊवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हे लिखाण म्हणजे माझा शोध नाही. भारतीय ज्योतिष शास्त्राला उपाय शास्त्राची जोड देऊन या सिद्धांतांचा उपयोग कसा करता येईल याबद्दलची माहिती वाचकांना द्यावी हा या लेखाचा उद्देश आहे. 2007 साली Rhonda Byrner हा या लेखकाचे ‘द सिव्रेट’ हे पुस्तक हाती पडले आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर ‘आस्क अँड इट इस गिव्हन’, ‘द लॉ ऑफ अट्रॅक्शन’, ‘गाईड टू रियालिटी’ ‘12 युनिव्हर्सल लॉज’ यासारख्या पुस्तकांमधून वैश्विक सिद्धांताविषयी आणि त्या सिद्धांतांचा रोजच्या आयुष्यामध्ये वापर कसा करता येईल याविषयी माहिती मिळाली. यातील कोणताही सिद्धांत हा भारतीय संस्कृतीला नवीन नाही. अद्वैत तत्त्वज्ञान, कबीराचे लिखाण, कर्म सिद्धांत अशा अनेक पद्धतीने याच सिद्धांतांना आपण जाणतो पण त्या सिद्धांतांचा उपयोग कसा करता येईल याविषयी आपल्याला माहिती नसते. काही छोट्या ट्रिक्स वापरून, थोडासा सराव केला तर आपण सहजतेने आपल्याला जे हवे ते मिळू शकतो. लॉ ऑफ व्हायब्र्रेशनचा पहिला नियम आहे की जगातली प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेने बनलेली आहे आणि ही ऊर्जा स्पंदन पावत आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर तुमच्या स्पंदनांना त्या नव्या असलेल्या गोष्टीच्या स्पंदनापर्यंत नेऊन त्या गोष्टीला आपल्याकडे आकर्षित करता यायला हवे. म्हणजेच ‘शिवम भुत्वा शिवम यजेत’!!!! हे कसे करायचे? चला जाणून घेऊया. इथे प्रत्येकाला मोठे व्हायचे आहे. पैसा कमवायचा आहे. या पदाची नोकरी हवी आहे. स्वत:चा बिझनेस हवा आहे. पण सगळ्यांच्या बाबतीत असे होते का? तर नाही. का नाही? कारण ज्या प्रकारची विचारसरणी आणि स्पंदने आपल्यात असायला हवी तशी नसतात आणि दुसरे कारण निगेटिव्ह किंवा नकारात्मक स्पंदनांच्या प्रभावाखाली आपण असतो. आयुष्यात थोडी जरी प्रगती करायची असली तरी हा नियम मनामध्ये कोरून ठेवा, नियम असा अशा कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, विचारांच्या प्रभावाखाली आपण येता कामा नये ज्यामुळे आपली अधोगती होईल. एका उदाहरणावरून हे समजून घेऊया. 19 साव्या शतकामध्ये प्रसिद्ध पावलेल्या ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक हुस्टर स्टेनर याने अॅमेझाँन येथील जंगलामध्ये आदिवासींमध्ये एक अत्यंत विस्मयकारी प्रथा पाहिली. एखाद्या झाडाला जर मारायचे असेल कुठल्याही हत्याराचा वापर न करता आदिवासींचा समूह त्या झाडाभोवती जमून त्या झाडाला मनापासून शिव्या शाप द्यायचा आणि काही दिवसांनी ते झाड खरोखर वाळून जायचे. झाडावर जर वायब्र्रेशन्सचा किंवा तरंगांचा असा परिणाम होत असेल तर संवेदनशील अशा मनुष्य प्राण्यावर का नाही होणार? तुमच्या आजूबाजूला नकारात्मक वाइब्ज, तुम्हाला घालून-पाडून बोलणारे, तुमच्या मूळ प्रवृत्तींपासून, स्वप्नांपासून परावृत्त करणारे लोक असतील (आणि ते सगळ्यांच्या आजूबाजूला असतात!!) तर त्यांना कटाक्षाने टाळायला शिका (क्रमश:)
महा उपाय: 19 मे ला श्री शनिश्वर जयंती आहे. या दिवशी करायचा एक महा उपाय तुम्हाला सांगतो. आपल्या घरातील वापरात नसलेले चामड्याचे पट्टे, चपला, शूज, जुने कपडे गरजू व्यक्तीला अत्यंत आदरपूर्वक दान द्याव्यात. त्याचबरोबर काही दक्षिणाही द्यावी. याच दिवशी खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान, वापरात नसलेल्या इलेक्ट्रिकच्या वस्तू, वायर इत्यादी घराबाहेर काढावे. नवीन संधी प्राप्त होतील. भाग्योदयाचे दरवाजे उघडतील.
मेष
लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी सुद्धा काही व्यवहारात तुम्हाला नमते घ्यावे लागेल. काही न पटणाऱ्या गोष्टी कराव्या लागतील. भविष्याच्या दृष्टीने धनसंचय करणे आवश्यक ठरेल. नात्यांच्या बाबतीत उदार धोरण ठेवणे योग्य ठरेल. वैवाहिक जीवनात उतार चढाव संभवतात.
उपाय लहान मुलांना शैक्षणिक साहित्य भेट द्यावे
वृषभ
पैशांच्या बाबतीमध्ये हा आठवडा चांगला असेल. एखादी नवीन आर्थिक योजना आखाल. स्थावर इस्टेटीच्या बाबतीत जर एखादा प्रŽ असेल तर तो सुटेल. अचानक धनलाभाच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. नोकरी बदलण्याच्या बाबतीत जर विचार करत असाल तर सध्या योग्य वेळ नाही आहे.
उपाय फळांचे दान द्यावे
मिथुन
ज्यांच्याकडून अपेक्षा नाही अशी माणसे ही मदतीचा हात पुढे करू शकतात. पण योग्य माणसाकडूनच मदत स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल. ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला कामी येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादांना टाळणे गरजेचे आहे. वैवाहिक जोडीदाराकडून उपहार प्राप्ती संभवते.
उपाय गूळ दान करा
कर्क
आर्थिक सुबत्ता येईल. लोकांनी दिलेला कुठला सल्ला ऐकावा आणि कुठला सोडावा याची योग्य जाणीव तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना राबवाल आणि त्याचे कौतुक होऊ शकते. कोणत्याही दडपणाखाली न येता निर्णय घ्यावा. वेळ पाळणे तुम्हाला जमणार नाही.
उपाय धार्मिक पुस्तकाचे दान द्यावे
सिंह
काळजी करण्याने तब्येत बिघडू शकते. या आठवड्यात खर्चावर आळा घालणे अत्यावश्यक ठरेल. आर्थिक नियोजन ढासळण्याची शक्मयता आहे. तुमच्या सल्ल्यामुळे लोकांचा फायदा होईल. काही लोक दिलेला शब्द पाळणार नाहीत. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराची मदत घ्यावी.
उपाय पांढरा हात रुमाल जवळ ठेवावा
कन्या
हा काळ धावपळीचा असेल. कामांचा उरक वाढवावा लागेल. जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. शरीराच्या उजव्या बाजूला छोटी मोठी दुखापत संभवते. कष्टांच्या तुलनेत आर्थिक आवक कमी असेल.
उपाय गंगाजलाने स्नान करावे
तूळ
आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. तब्येतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी त्रास देऊ शकतात. पायाचे दुखणे वाढू शकते. पुढील भविष्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कागदोपत्री व्यवहारात चोख रहा. कामांचे कौतुक होईल. परिवारातील सदस्यांचे मन सांभाळण्यात वेळ वाया जाईल.
उपाय बेलाचे पान जवळ ठेवावे
वृश्चिक
एखाद्या व्यक्तीने तुमच्या मताप्रमाणे वागले पाहिजे असा हट्ट करून चालणार नाही. त्याने नात्यांमध्ये कडूपणा येऊ शकतो.. अति चोखंदळपणामुळे नुकसान होऊ शकते. पैशांच्याबाबतीत सर्वसाधारण काळ असेल. वैवाहिक जीवनामध्ये तडजोड करावी लागू शकते. प्रेमींनी सावध राहावे.
उपाय पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे
धनु
तुम्ही केलेल्या कष्टांचा योग्य परतावा मिळण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक समारंभात भाग घेऊ शकता. एखाद्या जुन्या मित्राची किंवा बरीच वर्ष न भेटलेल्या नातेवाईकांची भेट होऊ शकते. आर्थिक बाबतीमध्ये समाधानी असाल. तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वैवाहिक आयुष्यात समाधान असेल.
उपाय वस्त्र दान करावे
मकर
आर्थिक बाबतीमध्ये तडजोड स्वीकारावी लागेल. नात्यातली एखादी व्यक्ती त्रास देऊ शकते. आर्थिक व्यवहार करत असताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रीचा सल्ला कामी येईल. वडिलांच्या तब्येतीबद्दल चिंता वाटू शकते. वैवाहिक जीवनात कलह येऊ नये याची काळजी घ्यावी.
उपाय पक्ष्यांना बाजरीचे दाणे घालावे
कुंभ
तुमचा राग दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर काढणे चुकीचे ठरेल. यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लांब राहणाऱ्या नातेवाईकांशी बोलणे झाल्याने मन प्रसन्न असेल. पारिवारिक संबंध घट्ट होतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो.
उपाय खिरीचे दान द्यावे
मीन
काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखमय असेल. पायाचे दुखणे वाढू शकते. खर्चावर आळा घालणे अत्यावश्यक ठरेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये गैरमार्गाने पैसा कमवण्याचा विचार करू नका. अति विचार करण्यामुळे थकवा येऊ शकतो. काही व्यक्ती मदतीचा हात पुढे करू शकतात.
उपाय – लाल रंगाचा दोरा मनगटाला बांधावा





