प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडीनजीकच्या सरस्वती पेट्रोल पंपासमोर ट्रक व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात उमाशंकर रामसुस्त भिल्ला (माणिकपूर-वसई) हा चालक गंभीररित्या जखमी झाला. त्यास तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
ओंकार विलास चकवरी (23, संगमेश्वर) या ट्रकचालकाने येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली. आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱया टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरासमोर वाहने धडकली. अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदतकार्य केले.









