ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 2 लाख 95 हजार 041 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांच्या भयावह आकडेवारीबरोबरच मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे दुसऱ्या लाटेतील संकट अधिक गडद झाल्याचे दिसून येते.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 82 हजार 553 एवढी आहे. शनिवारी 1,67,457 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 32 लाख 76 हजार 039 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 21 लाख 57 हजार 538 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 13 कोटी 01 लाख 19 हजार 310 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 27 कोटी 10 लाख 53 हजार 392 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 16 लाख 39 हजार 357 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.20) करण्यात आल्या.