प्रतिनिधी /बेळगाव
शहारातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरात फिरणाऱया भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरासह उपनगरात बेळगाव-वेंगुर्ला मार्ग व इतर ठिकाणी भटक्या जनावरांचा कळप भर रस्त्यातच ठाण मांडून बसत आहे. केवळ शहरातच नव्हे तर आता शहराबाहेरील रस्त्यांवरही भटक्मया जनावरांचा अडथळा निर्माण होताना दिसत आहे.
शहराबरोबर उपनगरातदेखील भटक्या जनावरांची संख्या वाढली असून शहराबाहेरील रस्त्यांवर आता ही भटकी जनावरे अडथळा ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात या जनावरांमुळे अपघात घडण्याची चिंता क्यक्त होत आहे. या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस या भटक्मया जनावरांचा प्रश्न गंभीर बनत असून बाजारात फिरणाऱया पादचाऱयांसह वाहतुकीलाही अडथळा ठरत आहेत. परिणामी जनावरे पकडण्याची मोहीम थंडावल्याने मोकाट फिरणाऱया जनावरांचा उपद्रव वाढला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ यासह कचराकुंडय़ांजवळ ही जनावरे ठाण मांडून बसत आहेत. शहराबरोबर आता शहराबाहेरील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. भटक्मया जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचा जीव धोक्मयात येत आहे. मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात हाती घेतली असली तरी रस्त्यांवर फिरणाऱया जनावरांची संख्या मात्र कमी झालेली नाही. काही वेळेला तर बाजारपेठेत या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. शहराबाहेरील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.









