मडगाव पालिकेत प्रात्यक्षिक, उद्याच्या बैठकीत चर्चा करून होणार निर्णय
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील भटक्मया कुत्र्यांचे निqिर्बिजीकरण करण्यासाठी मडगाव पालिकेने नियुक्त केलेल्या दक्षिण गोवा प्राणी कल्याण संघटनेकडून योग्य प्रकारे मोहीम राबविली जात नसल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता वर्ल्ड व्हाईड वेटेरनॅरी सर्व्हिस इंडिया यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर विचार करण्याचे ठरविले असून त्यासंदर्भात सोमवारी सायंकाळी नगरसेवकांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. बुधवारी होणाऱया पालिका मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी दिली.
मडगाव पालिकेच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दक्षिण गोवा प्राणी कल्याण संघटनेकडून योग्य प्रकारे निर्बिजीकरण केले जात नसून फोन कॉलही एखाद्या भटक्मया कुत्र्यासंदर्भात कल्पना देण्यासाठी केले असता सदर संघटनेचे पदाधिकारी उचलत नसतात, अशा कैफियती नगरसेवकांकडून मांडण्यात आल्या होत्या. पालिकेच्या अधिकाऱयांनी मागील संघटनेची मागील कित्येक महिन्यांची बिले त्रुटीमुळे मंजूर केली नव्हती व त्यांच्या कराराचे नूतनीकरणही केले नव्हते.
नगराध्यक्षांनी बिले प्रमाणित करून फेडण्यास तसेच कंत्राटाचे नूतनीकरण करण्यास सूचित केले असता बहुतेक नगरसेवकांनी त्यास आक्षेप घेतला होता. यावेळी नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी वरील यंत्रणेचा प्रस्ताव असून त्यावर पालिकेने विचार करावा, कारण सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे आणि सध्या महिन्याकाठी 70 हजार फेडूनही निर्बिजीकरण योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी आहेत याकडे लक्ष वेधले होते.
नगराध्यक्षांनी बुधवारच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी त्याचा कार्यक्रमपत्रिकेत समावेश केला आहे. त्यासंदर्भात आगावू माहिती देण्यासाठी वरील संघटनेच्या डॉ. कर्लेट फर्नांडिस यांनी प्रात्यक्षिक दाखविले. सांखळी तसेच अन्य पालिका आणि पंचायतींनी सदर योजनेचा फायदा घेतल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. पालिकेला फक्त जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, अन्य साधनसामग्री व निर्बिजीकरणासाठी सरकार आर्थिक साहाय्य उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच निर्बिजीकरणाबाबत प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. यावेळी नगरसेवक घनश्याम शिरोडकर व सगुण उर्फ दादा नाईक यांनी काही प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. नगराध्यक्ष पेरेरा, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, नगरसेवक रवींद्र नाईक, कामिलो बार्रेटो, पूजा नाईक, जॉनी क्रास्टो, लता पेडणेकर, व्हितोरिनो फर्नांडिस, महेश आमोणकर तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते.
बहुतेक नगरसेवक अनुपस्थित
10 ते 11 सोडले, तर अन्य बहुतेक नगरसेवक यावेळी अनुपस्थित राहिले व यातून भटक्मया कुत्र्यांच्या समस्येबद्दल पडून न गेल्याचे दाखवून दिले.









