प्रतिनिधी / बेळगाव
भगवे वादळ युवक संघाच्यावतीने बुधवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताची गरज भासत असल्याने या मंडळाकडून रक्तदान शिबिराचा उपक्रम हाती घेण्यात आला.
प्रा. अनिल चौधरी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आमदार अनिल बेनके यांनी शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
सध्या लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने सकाळी 8 ते 11 या वेळेत कुलकर्णी गल्ली येथील वाळवेकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. केएलई ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
यावेळी अध्यक्ष प्रसाद मोरे, सचिन उंदरे, चंद्रकांत माळी, विकास तानवडे, मनोज तानवडे, मेघन तारिहाळकर, हरिष माळी, मयुरेश माळी, अमोल माळी, प्रवीण रेडेकर, संतोष निकम उपस्थित होते. उपाध्यक्ष महेश काकतकर यांनी आभार मानले.









