प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास व गडकोटांचे महत्त्व तरुणपिढीने समजून घ्यावे, यासाठी भगवे वादळ संघ सदैव प्रयत्नशील असतो. कोरोनाकाळामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह करता न आल्याने मंगळवार दि. 9 रोजी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये एकूण 53 स्पर्धकांनी भाग घेतला होता. दीपप्रज्वलनाने व शिवाजी महाराज मूर्तीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
उपाध्यक्ष महेश काकतकर यांनी प्रास्ताविक केले व त्यानंतर आमदार अनिल बेनके यांनी या स्पर्धेचे उद्दिष्ट समजावून सांगितले. अनिल चौधरी यांनी शिवरायांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली.
यावेळी शिवव्याख्याते अनिल चौधरी, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती, नगरसेवक संतोष पेडणेकर, नगरसेवक डॉ. शंकर पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, चंद्रकांत माळी, परशराम माळी, अक्षय जुवेकर, भगवे वादळ युवक संघाचे अध्यक्ष प्रसाद मोरे व उपाध्यक्ष महेश काकतकर व विकास तानवडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यामध्ये मिळविलेल्या बक्षिसांपैकी काही बक्षिसे सर्वमला देऊ केल्याने त्यांचे खास कौतुक केले गेले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. सूत्रसंचालन सुमित सुरेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मेघन तारिहाळकर
यांनी केले.
स्पर्धेत बक्षीस मिळविलेले स्पर्धक खालीलप्रमाणे-
1) किल्ले पन्हाळा-संयुक्त छत्रपती शिवाजीनगर, बेळगाव, 2) किल्ले राजगड, कोनवाळ गल्ली, बेळगाव, 3) किल्ले वेल्लोर, स्वराज मित्रमंडळ, भांदूर गल्ली बेळगाव, 4) किल्ले जिंजी, शिवतलवार युवक मंडळ, जुने बेळगाव, 5) किल्ले मोरा-मुल्हेर, छत्रपती युवक मंडळ, शाहूनगर बेळगाव.
उत्तेजनार्थ-रौद्र शंभू युवक मंडळ, कंग्राळी, किल्ले लोहगड, शिवजयंती उत्सव मंडळ, संत रोहिदासनगर-किल्ले बेळगाव भुईकोट, बालशिवाजी युवक मंडळ, रामा मेस्त्री अड्डा-किल्ले तोरणा, नरवीर तानाजी तालीम, जुने बेळगाव-किल्ले उदगीर, रामलिंग युवक मंडळ, जुने बेळगाव-किल्ले औसा.
वैयक्तिक पारितोषिके
उत्कृष्ट माहितीकरिता (पुरुष)- बहिर्जी नाईक पुरस्कार, रितेश पाटील, किल्ले मोरा मुल्हेर व बेळगाव, उत्कृष्ट माहितीकरिता (महिला)-शिवकन्या पुरस्कार, खुशी रमेश भोसले, किल्ले रामसेज, उत्कृष्ट बांधणीकरिता-हिरोजी इंदुलकर पुरस्कार-किल्ले धारूर-गणेश युवक मंडळ, गणेशपेठ, जुने बेळगाव.
यावर्षीचा गडांचा राजा रोख 11,111 रुपये व स्मृतिचिन्ह दुर्ग सम्राट हा किताब-किल्ले पुरंदर, वज्रगड व मल्हारगड, श्री युवक मंडळ, शाहूनगर बेळगाव मानकरी ठरले.









