श्रीमद भागवत ग्रंथामध्ये चौथ्या स्कंधामध्ये रुद्रगीत नावाचा अध्याय आहे. त्यामध्ये शिव भगवान आपले प्रेम कोणावर आहे हे सांगत आहेत. येणाऱया महाशिवरात्री उत्सवानिमित्त एक चिंतन करण्यासाठी हा विशेष लेख…
अध्याय चोवीसमध्ये वर्णन आहे यः परं रंहसः साक्षात्त्रिरगुणाज्जीवसंज्ञितात् ।भगवन्तं वासुदेवं प्रपन्नः स प्रियो हि मे अर्थात ‘भगवान शिव म्हणाले, भौतिक प्रकृती, जीव तसेच अस्तित्वातील यच्चयावत वस्तूंचे नियंत्रक असणाऱया भगवान श्रीकृष्णांना जो कोणी शरण जातो, तो मला निश्चितच प्रिय आहे.’ भगवान वासुदेव कृष्ण हे सामान्य जीवांसाठीच पूज्य आहेत असे नव्हे, तर शिव, ब्रह्मा यासारख्या देवतांनादेखील पूज्य आहेत. सर्व देवतांकडून भगवान श्रीकृष्णाची आराधना केली जाते. हरिभक्तांच्या संदर्भातही असेच घडते. जो मनुष्य हरिभक्तीचा स्वीकार करतो, तो श्रीकृष्णभक्तीचे स्वरूप काय आहे यांचा शोध घेऊन ते जाणून घेण्याचा प्रारंभिक अवस्थेत असणाऱया भक्ताला तात्काळ प्रिय होतो. त्याचप्रमाणे सर्व देवता, कोणता मनुष्य वास्तविकपणे भगवान वासुदेवाला शरण गेलेला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात. या प्रसंगातही प्राचीनबर्री राजाचे पुत्र प्रचेत भगवान वासुदेवाना शरण गेले असल्यामुळे शंकर त्यांची भेट घेण्यास स्वेच्छेने पुढे आले. राजपुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी तसेच त्यांचे कल्याण करण्यासाठी भगवान शिवजी त्यांच्यासमोर प्रकट झाले होते. त्यांनी व्यक्तिशः प्रचेतना हा मंत्र दिला जेणेकरून तो अधिक सामर्थ्यशाली ठरणार होता आणि त्यांनी राजपुत्रांना या मंत्रांचे उच्चारण करण्याचा उपदेश केला आणि आपले शब्द ध्यानपूर्वक ऐकावेत असे भगवान शिवानी प्रचेतांना सांगितले. इदं विविक्तं जप्तव्यं पवित्रं मङ्गलं परम् । निःश्रेयसकरं चापि श्रूयतां तद्वदामि वः । अर्थात ‘आता मी तुम्हाला दिव्य, शुद्ध आणि मंगलमय मंत्र सांगतो आणि तो मंत्र म्हणजे जीवनाचे अंतिम ध्येय प्राप्त करू इच्छिणाऱया मनुष्याने म्हणावयाची सर्वोच्च प्रार्थना आहे, मी या मंत्राचे उच्चारण करताना कृपया तुम्ही तो ध्यानपूर्वक ऐकावा’ असे म्हणून भगवान शिवजींनी सर्वासमक्ष प्रार्थनेला सुरुवात केली. (जागेअभावी काही मोजकेच श्लोक येथे दिले आहेत)
श्रीरुद्र उवाच, जितं त आत्मविद्वर्यस्वस्तये स्वस्तिरस्तु मे । भवताराधसा राद्धसर्वस्मा आत्मने नमः। अर्थात ‘श्री रुद्रानी पुढील प्रार्थनेने पुरुषोत्तम भगवंतांना संबोधित केले आहे-हे भगवान, तुमचा विजय असो! तुम्ही सर्व आत्मसाक्षात्कारी पुरुषामध्ये सर्वश्रे÷ आहात. तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्यक्तींसाठी सदैव शुभदायी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही दिलेल्या परिपूर्ण उपदेशाच्या योगाने तुम्ही आराध्य आहात. तुम्हीच परमात्मा आहात, यास्तव सर्वश्रे÷ जीव या रूपातील तुम्हाला माझे सादर नमन असो’ नमः पङ्कजनाभाय भूतसूक्ष्मेन्दियात्मने । वासुदेवाय शान्ताय कूटस्थाय स्वरोचिषे । अर्थात ‘तुमच्या नाभीतून उगम पावणाऱया कमळामुळे तुम्ही सृष्टीचे मूळ आहात. तुम्ही इंद्रिये आणि इंद्रियविषयांचे नियंत्रक आहात आणि तुम्हीच सर्वव्यापी वासुदेव आहात. तुम्ही शांततेची मूर्ती आहात आणि आपल्या स्वयंप्रकाशित अस्तित्वामुळे तुम्ही सहा विकारांनी कधीही विचलित होत नाही. सङ्कर्षणाय सूक्ष्माय दुरन्तायान्तकाय च । नमो विश्वप्रबोधाय प्रद्युम्नायान्तरात्मने। अर्थात ‘हे भगवान, तुम्ही सूक्ष्म भौतिक घटकांचे उगमस्थान, अखिल संकलनाचे तसेच विघटनाचे स्वामी, संकर्षण नामक अधि÷ाता आणि बुद्धीचे प्रद्युम्ननामक अधि÷ाता आहात म्हणून मी तुम्हाला सादर नमन करतो. नमो नमो।़निरुद्धाय हृषीकेशेन्दियात्मने । नमः परमहंसाय पूर्णाय निभृतात्मने । अर्थात ‘हे नाथ, अनिरुद्धनामक सर्वश्रे÷ मार्गदर्शक अधि÷ाता म्हणून तुम्ही इंद्रियांचे आणि मनांचे स्वामी आहात, यास्तव मी तुम्हाला वारंवार प्रणाम करतो. तुमच्या मुखातून प्रकट होणाऱया प्रखर अग्निज्वाळांमुळे संपूर्ण विश्व नष्ट करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही अनंत तसेच संकर्षण म्हणूनही प्रख्यात आहात. नम ऊर्ज इषे त्रय्याः पतये यज्ञरेतसे। तृप्तिदाय च जीवानां नमः सर्वरसात्मने । अर्थात ‘हे भगवान, तुम्ही पितृलोकांचे तसेच देवतांचेही पोषणकर्ते आहात. तुम्ही चंद्राचे अधि÷ान तसेच तीन वेदांचे स्वामी आहात. सर्व जीवांच्या तृप्तीचे तुम्ही मूळ उगमस्थान असल्यामुळे मी तुम्हाला सादर प्रणाम करतो.’ सर्वसत्त्वात्मदेहाय विशेषाय स्थवीयसे । नमस्त्रwलोक्मयपालाय सह ओजोबलाय च। अर्थात ‘हे भगवान, तुम्ही अमर्याद असे विराट रूप असून तुमच्या ठायी सर्व जीवांचे व्यक्तिगत देह समाविष्ट आहेत. तुम्ही त्रैलोक्मयाचे पालनकर्ते आहात आणि म्हणून तुम्ही त्रैलोक्मयातील मन, इंद्रिये, देह आणि प्राणवायू यांचे पालन करता. यास्तव तुम्हाला माझे आदरपूर्वक नमन असो. पदा शरत्पद्मपलाशरोचिषा नखद्युभिर्नो।़न्तरघं विधुन्वता । प्रदर्शय स्वीयमपास्तसाध्वसं पदं गुरो मार्गगुरुस्तमोजुषाम् अर्थात ‘हे प्रभो, तुमचे चरणकमल अत्यंत सुंदर आहेत आणि ते शरद ऋतूतील कमळांच्या उमलत्या पाकळय़ांसमान दिसतात. इतकेच नव्हे तर, तुमच्या चरणकमळांच्या नखांपासून इतके असीम तेज उत्सर्जित होते की त्यामुळे बद्ध जीवांचा अंतःकरणातील अंधकार त्वरित नष्ट होतो. हे नाथ, भक्तांच्या हृदयातील अंधकार सदैव नष्ट करणारे तुमचे रूप कृपया मला दाखवा. हे स्वामी तुम्ही प्रत्येकाचे सर्वश्रे÷ आध्यात्मिक गुरु आहात, म्हणून आध्यात्मिक गुरुच्या रूपाने तुम्ही अज्ञानांधकाराच्या आवरणाखाली असलेल्या सर्व बद्ध जीवांना प्रबुद्ध करू शकता. एतद्रूपम-
नुध्येयमात्मशुद्धिमभीप्सताम् । यद्भक्तियोगो।़भयदः स्वधर्ममनुति÷ताम् अर्थात ‘हे प्रभो, आपले अस्तित्व शुद्ध करून घेण्याची इच्छा असणाऱया मनुष्यांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे सदैव तुमच्या चरणकमळांचे ध्यान करणे अत्यावश्यक आहे. तसेच जे आपल्या स्वधर्माचरणाविषयी गंभीर असून भयमुक्त होऊ इच्छितात त्यांनी भक्तियोगाचा हा मार्ग स्वीकारलाच पाहिजे.’ अथेदं नित्यदा युक्तो जपन्नवहितः पुमान्।अचिराच्छेय आप्नोति वासुदेवपरायणः। अर्थात ‘ज्या कृष्णभक्तांचे मन सदैव कृष्णचिंतनात तल्लीन झालेले आहे आणि जो अत्यंत आदरपूर्वक आणि ध्यानपूर्वक या स्तोत्राचा जप करतो, त्याला जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त होते.
शेवटी या प्रार्थनेचे महत्त्व आणि श्रुतिफल सांगताना भगवान शिवजी म्हणतात, श्रेयसामिह सर्वेषां ज्ञानं निःश्रेयसं परम् । सुखं तरति दुष्पारं ज्ञाननौर्व्यसनार्णवम् । अर्थात ‘या इहलोकी विविध प्रकारचे लाभ प्राप्त करता येतात परंतु त्या सर्वांमध्ये ज्ञानाची प्राप्ती सर्वश्रे÷ मानली जाते, कारण केवळ ज्ञानाच्या नौकेवर आरूढ होऊन मनुष्य अज्ञानाचा सागर पार करू शकतो’. वास्तविकपणे अज्ञानामुळेच प्रत्येकजण या भौतिक जगात दुःख भोगत आहे. भगवान शिवजी म्हणतात य इमं श्रद्धया युक्तो मद्गीतं भगवत्स्तवम् । अधीयानो दुराराध्यं हरिमाराधयत्यसौ अर्थात ‘भगवान श्रीहरीची भक्तीमय सेवा करणे आणि त्यांची आराधना करणे जरी अतिशय कठीण असले तरी मनुष्याने मी रचिलेल्या आणि गायिलेल्या या स्तोत्राचे केवळ पठण वा उच्चारण केल्यास त्याला अगदी सहजपणे
श्रीहरीची कृपा प्राप्त करता येते’
वृंदावनदास








