अभिनेत्री मौनी रॉयची मन की बात , करमणूक क्षेत्र तणावाने भरलेले
भगवद्गीतेला शालेय अभ्यासक्रमात सामील करण्यात यावे. भगवद्गीतेन प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. याची गरज केवळ शाळा किंवा भारताला नसून जगभराला आहे. करमणूक क्षेत्र तणावपूर्ण असल्याने त्याला भगवद्गीतेची अत्यंत गरज असल्याचे उद्गार 35 वर्षीय अभिनेत्री मौनी रॉयने काढले आहेत.
धर्मग्रंथापेक्षाही अधिक महत्त्व
बालपणी भगवद्गीतेचा सार वाचला होता. पण आतापर्यंत तो मला समजू शकला नव्हता. माझ्या एका मैत्रिणीने भगवद्गीतेचा अर्थ शिकविण्यासाठी सुरुवात केली आणि लॉकडाउनपूर्वी मी या वर्गात सामील झाले. अत्यंत व्यस्त वेळापत्रक असल्याने अधिक वर्गात भाग घेऊ शकले नाही पण लॉकडाउनदरम्यान मी अत्यंत धार्मिक हेते. भगवद्गीतेला शालेय अभ्यासक्रमात सामील केले जावे. हे धार्मिक पुस्तकापेक्षा वरचढ आहे. हे जीवनाचे सार, शाश्वत आणि मूलभूत ज्ञान आहे. जर एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास गीतेत त्याचे उत्तर असल्याचे मौनी म्हणाली.
अज्ञानात राहतो
आम्ही वेद आणि उपनिषदांच्या देशांमधील आहोत, तरीही काहीच करत नाही. आम्ही अज्ञानात जगतो. आम्ही सोन्याच्या खाणीवर बसलो आहोत आणि यासंबंधी काहीच करत नाही. करमणूक क्षेत्र तणावपूर्ण आहे. या क्षेत्रात शनिवार आणि रविवार, 9-5 कामाची संकल्पना नाही. आम्ही सातत्याने आमचे मन आणि विचारांमध्ये गुंतून राहतो. याचमुळे येथे भगवद्गीता समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. सर्वांना गीतेतील उपदेशांची आवश्यकता असल्याचे मौनीने म्हटले आहे.
लवकरच विवाह शक्य
मौनी आता अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसून येणार आहे. यात रणवीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. मौनी लवकरच दुबईतील बँकर सूरज नांबियारसोबत विवाह करणार असल्याची चर्चा आहे.









