वसुदेवांचा विचार ऐकून नारदाना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, ‘भागवत धर्म अतिशय अलौकिक असून केवळ ऐकण्याने श्रोत्यांचा उद्धार होतो.’ असे म्हणून त्यांनी भागवतधर्माचा इतिहास सांगायला सुरुवात केली.
ते म्हणाले, ‘पूर्वी जनक राजाने अशीच उत्सुकता दाखवल्यावर वृषभ पुत्र अर्षभ यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. अर्षभांची एकूण संख्या नऊ होती. जनक राजाचे यज्ञकर्म संपन्न होत असताना तेथे वेदविद्यासंपन्न अशा वृषभ पुत्र अर्षभांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनाने राजाला मोठा आनंद झाला. कारण भागवतभक्तांची भेट तेव्हाच होते जेव्हा कोटी कोटी पुण्ये उभी राहतात. अशा भक्तांची भेट झाली की, संसाराचे संकट बाधू शकत नाही. आणि जन्म मरणाचा फेरा चुकतो. राजाने त्यांचा मोठा सन्मान केला आणि त्यांना विनंती केली की, कृपा करून ‘आत्यंतिक क्षेम’ म्हणजे काय ते मला सांगा. त्यावर अर्षभ म्हणाले, ‘भागवतधर्म हेच आत्यंतिक क्षेमाचे वर्म आहे.’ त्यावर जनकराजांनी, भागवतधर्माची विस्तृत माहिती कृपया द्या’ अशी विनवणी केली. नऊ आर्षभापैकी ‘आत्यंतिक क्षेम’ या विषयात कवी नावाचे अर्षभ अत्यंत निष्णात होते. ते सांगू लागले, ‘हे राजा, माणसाला हा देह म्हणजेच मी असे वाटत असते. या देहबुद्धीमुळेच माणूस अहंकारी होतो आणि सुखोपभोगांची हाव बाळगून जन्म मरणाच्या फेऱयात अडकतो. यातून सुटण्यासाठी इंद्रिये ताब्यात ठेवून विषयातून सुटू पाहतो. पण विषय तर त्याला पुनः पुन्हा कवटाळू पाहतात. माणसाची ही अवस्था बघितल्यावर वेदांनी हरिभक्ती प्रकट करून ठेवली आहे. काया, वाचा आणि मनाने आपले म्हणून जे काही आहे ते भगवंताला अर्पण करणे म्हणजेच भागवतधर्म होय.’ आपल्या अकरा इंद्रियांच्या वृत्ती भगवत भक्तीत कशा लावायच्या हे आता हर्षभ कवी कथन करणार आहेत. जनक राजांनी विचारल्याप्रमाणे, ‘आत्यंतिक क्षेम’ यावर कवी नावाच्या आर्षभानी सांगितले की,
कायेन वाचा मनसेन्दियैर्वा बुद्ध्यात्मना Jee He´ke=Àlesë mJeYeeJeeled ~ करोमि ³eÐelmekeÀueb परस्मै नारायणायेति समर्पयामि ।
हा कृष्णार्पण द्योतक श्लोक ध्यानात घेणे आणि आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करणे म्हणजे ‘भागवतधर्म’. पुढे म्हणाले, ‘आपल्या अकरा इंद्रियांचा उपयोग करून भगवतभक्ती कशी करावी हे आता सांगतो, मनाने हरीचे ध्यान करावे, कानाने त्याची कीर्ती सतत ऐकावी, जिभेने नामस्मरण करावे, हाताने हरीची पूजा करावी,
पायाने मंदिराची वाट चालावी, हरिचरणी वाहिलेल्या तुळशींचा नाकाने वास घ्यावा, निर्माल्य मस्तकावर धारण करावे म्हणजे त्याबद्दल पूज्य भाव असावा, तीर्थ व हरिप्रसाद पोटात घ्यावा.
याप्रमाणे इंद्रियांचे वर्तन चालू ठेवावे म्हणजे सद्भाव वाढू लागतो, प्रेम प्रकट होऊ लागते व अखंड भजन घडू लागते. परिणामी संसार बंधनातून सुटका होते.
क्रमशः








