वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया वुर्सेस्टरशायर क्रिकेट क्लबने न्यूझीलंडचा अष्टपेलू मायकेल ब्रेसवेलबरोबर 2023 च्या टी-20 क्रिकेट हंगामासाठी नुकताच नवा करार केला आहे.
अष्टपैलू ब्रेसवेल हा मधल्या फळीत फलंदाजी करत असून तो एक उपयुक्त फिरकी गोलंदाज आहे. या वर्षाच्या प्रारंभी त्याला क्रिकेट न्यूझीलंडने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून ब्रेक दिला होता. त्याने इंग्लंडविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले. 2021-22 च्या सुपर स्मॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेत ब्रेसवेल हा सर्वाधिक धावा जमवणारा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ठरला. वेलिंग्टन संघाकडून खेळताना त्याने 79.66 धावांच्या सरासरीने 478 धावा जमवल्या. तसेच त्याने टी-20 प्रकारात सेंट्रल स्टेज संघाविरुद्ध नाबाद 141 धावा झळकवल्या होत्या. गेल्या उन्हाळी मोसमात झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात ब्रेसवेलने आपल्या फटकेबाजीचे दर्शन घडवताना 82 चेंडूत 127 धावा जमवल्या होत्या.









