साहित्य : 10 गव्हाचे ब्रेड स्लाईस, 1 वाटी दही, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरं, 1 हिरवी मिरची बारीक चिरुन, 3 ते 4 कढीपत्ता पाने, 1 चमचा आलं किसून, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे तेल, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर
कृती : प्रथम बेडचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. आता बाऊलमध्ये दही घेऊन त्यात हळद पावडर, मीठ आणि दोन चमचे पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात बेडचे तुकडे मिक्स करावेत. गॅसच्या मंद आचेवर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकावे. नंतर त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आलं टाकून मिश्रण परतवून घ्यावे. आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून हलक्या सोनेरी रंगावर परतवून घ्यावा. शेवटी बेडचे मिश्रण ओतून मंद आचेवरच मिश्रण हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत एकसारखे परतत राहावे. आता तयार भुर्जी कोथिंबीरीने सजवून नाश्त्यासोबत खाण्यास द्या.