प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर कोकरूड मार्गावर ता. शाहूवाडी येथील घाटात ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ब्रेक फेल झाल्याने 50 फुट खोल दरीत कोसळला .जाऊन येळाणे तालुका शाहूवाडी येथील जीवन धोंडीराम गुरव या कष्टकरी शेतकऱ्याचे नऊ ते दहा टन उसाचे नुकसान झाले असून या नुकसान भरपाई ला आधार कोणाचा अशी चर्चा नागरीकातून होत असून या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येऊ लागली आहे. ट्रॅक्टर चालक शंकर पाटील हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विराणे तालुका शाहूवाडी येथील जीवन धोंडीराम गुरव यांचा उस निनाईदेवी सहकारी साखर कारखाना तालुका शिराळा येथे गाळपासाठी ट्रॅक्टर मधून पाठवला जात होता मलकापूर कोकरूड मार्गावरील अमेनी घाटात ट्रॅक्टर चा ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर 50 फूट खोल दरीत कोसळला यावेळी ट्रॅक्टर ट्रॉली भरलेला सर्व बॉस घाटात विखुरला गेला गेला या अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर पाटील हे जखमी झाले.
…आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले
वर्षभर कष्ट जिद्द आणि प्रयोगशील वृत्तीन युवा शेतकरी जीवन गुरव यांनी ऊस पीक चांगले आणले होते. यावेळी आपला ऊस चांगला जाईल व आपणास चांगला आर्थिक लाभ होईल या मोठ्या आशेन पिकवलेला ऊस घाटात विखुरलेला बघून जीवन गुरव यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आपल्या केलेल्या कष्टाचं मातीमोल झालेले नुकसान त्याच्यां चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांना मदत मिळणं गरजेचं आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने ही त्याचबरोबर वाहनधारकांनी ही या बाबत गांभीर्य पूर्वक विचार करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येऊ लागली आहे.
वाहनाला विमा पण ऊसाचं काय
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला तर अशा प्रसंगी वाहनाचा असलेला विमा त्या वाहनधारकांना आधारभूत ठरवत आहे मात्र त्यात असलेल्या ऊस आणि त्याचं झालेले नुकसान याला मात्र भरपाई मिळणार कशी या नुकसानीला जबाबदार कोण यासाठी सुद्धा गांभीर्यपूर्वक विचार होणे गरजेचे असून, या झालेल्या नुकसानीबाबत जीवन गुरव या कष्टकरी शेतकऱ्यांना मदतीचा हात कारखाना प्रशासनाबरोबरच वाहनधारकांनी ही करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागले आहे.









