वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले बंदर परीसरात रापण लावण्याच्या जागेत टाकलेल्या ब्रेकवॉटर चॅनलमुळे रापण मच्छीमारी धोक्यात आली आहे. हि निर्माण झालेली समस्या त्वरीत दूर करण्यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीचे निवेदन आज गुरूवारी वेंगुर्ले तहसिलदारांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत ते ब्रेकवॉटर चॅनल न हटविले गेल्यास त्या ठिकाणी भाजपातर्फे रापण मच्छीमार आंदोलन छेडतील असा इशारा निवेदन देण्यास आलेल्या मच्छीमारांनी व्यक्त केला आहे.
वेंगुर्ले बंदर परीसरांत नवाबाग-उभादांडा भागात रापणीव्दारे पारंपारीक मच्छुमारी केल जाते. या मच्छीमारीवर सुमारे 200 कुटुंबाचा उदर निर्वाह चालतो. वेंगुर्ले बंदर जेटीकडून मांडवी खाडीत जाणाऱ्या जलमार्गात खाडी मुखाशी गाळ साचत असल्याने अनेक वर्षे मच्छीमारांना मासेमारी करताना येणारी अडचण लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी ब्रेकवॉटर घालण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बनविण्यात आलेले ब्रेकवॉटर चॅनल ( त्रिशंकू आकाराचे भले मोठे दगड) हे रापण मच्छीमारी करण्यांत येणाऱ्या जागेत अस्तावस्त टाकल्याने मत्स्यबंदिच्या काळांत समुद्री तुफान व वादळी हवामान पाहून किनाऱ्यावरून मासेमारी करण्यास मुभा असलेल्या रापण मच्छीमारीस बाधा निर्माण झाली आहे. सदरचे ब्रेकवॉटर चॅनल बाजूला हलविण्याची मागणी शासनाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. तशा अवस्थेत मासेमारी केल्यास रापणीची जाळी तुटून नुकसान तर होडी दगडावर आपटून होडीचे नुकसान तसेच जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 ते 15 जुलै पर्यतच्या हंगामी सिझनपासून रापण मच्छीमारांची नुकसानी झालेली आहे. संबधित ठेकेदारास मच्छीमारांनी याची कल्पना देवूनही अद्यापपर्यत ते दगड त्याजागेहून इतरत्र हलविलेले नाहीत. संबधित ठेकेदारांस ते ब्रेकवॉटर चॅनल दुसऱ्या जागी हलवून रापण लावण्याची जागा खुली करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत. व मच्छीमारांची समस्या दूर करावी. अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, रापण संघाचे रामचंद्र आरावंदेकर, सुबोध खडपकर, मोहन खराडे, दादा केळूसकर यांचा समावेश होता.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत रापण मच्छीमारीच्या भागात अस्ताव्यस्त टाकलेले ब्रेकवॉटर चॅनल अडचण ठरत असून ते न हटविल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे रापण मच्छीमारांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही लेखी निवेदनाव्दारे व्यक्त करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









