मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्थापलेली कंपनी
वृत्तसंस्था / मुंबई
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखाली वाटचाल करणारी देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) तसेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या नेतृत्त्वातील ब्रेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड एलपी (बीइव्ही)मध्ये जवळपास 372 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. सदरच्या व्यवहारासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये करार करण्यात आल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे.
रेग्युलेटरी फायलिंगच्या आधारे रिलायन्सने ब्रेकथ्रू एनर्जीमध्ये 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. 50 दशलक्ष डॉलर्समधील हा गुंतवणुकीचा हिस्सा आहे. अन्य गुंतवणूक येत्या 8 ते 10 वर्षाच्या कालावधीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हवामान बदलावरील वादावर मार्ग काढण्यासाठी बीइव्ही निधी उभारत आहे. या निधीचा वापर स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. स्वच्छ ऊर्जेसंबंधात योग्य मार्ग काढण्यासाठी भारतासोबत महत्त्वपूर्ण संबंध असल्याचेही नमूद केले आहे. दोन्ही कंपन्यांमधील व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची(आरबीआय) मान्यता मिळण्याची आवश्यकता असते. यामुळे सदर निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.