[1:07 PM, 10/22/2021] Abhijit Shinde Social Media: ओनलाईन टीम/तरुण भारत
ब्रिटीश परराष्ट्र सचिव एलिझाबेथ ट्रस (Elizabeth Trus) आज आपल्या भारत दौऱ्याला सुरुवात करून आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S.Jayshankar) यांच्याशी चर्चा करतील, त्यांच्या दौऱ्यादरम्यान संरक्षण, व्यापार आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी चर्चा होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही देशांचे उच्चाधिकारी “रोडमॅप 2030” (Roadmap 2030)चा आढावा घेतील .“रोडमॅप 2030”हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M. (Narendra Modi) आणि त्यांचे ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्यात व्हर्च्युअल शिखर परिषदेदरम्यान घोषित केलेला एक उपक्रम आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. नवी दिल्लीत एलिझाबेथ ट्रस शुक्रवारी जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर ती 23 ऑक्टोबर रोजी ते मुंबईसाठी रवाना होतील. तर ट्रॉस यांचा भारत दौरा 24 ऑक्टोबरला संपेल.
Previous Articleपेट्रोल-डिझेलवरील टॅक्समधून सरकारने 23 लाख कोटी कमावले
Next Article संभाजी भिडे यांचे समीर वानखेडेंना समर्थन









