मुंबई
बिस्कीट उद्योगातील कंपनी ब्रिटानियाने मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीअखेर आपल्या निव्वळ नफ्यात 4 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. कंपनीने 31 मार्चला संपलेल्या तिमाहीत 378 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जानेवारी ते मार्च 2021 या दरम्यान कंपनीने 360 कोटी रुपयांचा नफा नोंदला होता. याच तिमाहीत कंपनीने 13 टक्के वाढीसह 3 हजार 550 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.









