लंडन
जगभरामध्ये पौष्टिक फळांमध्ये केळीचे महत्त्व अधिक गणले जाते. याची किमत परवडणारी असल्याने या फळाची मागणी श्रीमंतापासून गरीबांपर्यंतच्या सर्व लोकांकडून आवर्जून होत असते. परंतु या केळय़ासंबंधी एक अजब घटना ब्रिटनमध्ये नुकतीच घडली असून ब्रिटनमध्ये एका महिलेला 100 रुपयांच्या केळीसाठी तब्बल 1 लाख 60 हजार रुपये इतकी किमत मोजावी लागली आहे. द टेलिग्राफच्या माहितीनुसार लंडन येथे राहणाऱया सायबरे ब्रर्न्स नावाची एक महिला ऑफिसला जातेवेळी रिटेल स्टोअरमध्ये गेली आणि नेहमीप्रमाणे तिथे केळीची खरेदी केली. सदर केळीची किमत ही 1 पाउंड स्टर्लिंग म्हणजे जवळपास 100 रुपये होती. परंतु या महिलेने गडबडीत ऑनलाईन पेमेंट करताना तब्बल 1 लाख 60 हजार रुपयाची रक्कम जमा केली असल्याची माहिती आहे. सध्या ऑनलाईनच्या वाढत्या व्यवहारांमुळे नागरिक अमर्याद ऑनलाईन स्वरुपात पेमेंट करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून अशा घटना कमी होण्यासाठी ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.









