दात चमकविण्याशी संबंधित 2.5 लाखवेळा विचारणा
हॉलिवूड कलाकारांप्रमाणे दात तयार करण्याची इच्छा
सध्या पूर्ण जग कोरोना महामारीला तोंड देत आहे. मागील दीड वर्षात शॉपिंग मॉल, हॉटेल, सिनेमा, मनोरंजन पार्कपासून दैनंदिन कामात समाविष्ट होणाऱया बहुतांश सेवा बंद राहिल्या. तरीही ब्रिटनचे लोक स्वतःला सजविण्यास-सुंदर दाखविण्यास अग्रेसर राहिले आहेत. यात सर्वात रंजक बाब दातांना चमकाविणे किंवा त्यांचा शुभ्रपणा वाढविण्याशी संबंधित विचारणा करण्याची आहे. याप्रकरणी पूर्ण ब्रिटनमध्ये लंडनवासीय आघाडीवर राहिले आहेत.
तेथे वर्षभरात 2.5 लाखांहून अधिक जणांनी दातांना चमकविण्याशी संबंधित विचारणा केली आहे. हॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे दात कसे चमकावावेत असे बहुतांश लोकांनी विचारले आहे. याकरता लोक भरभक्कम रक्कम खर्च करण्यासही तयार दिसून आल्याचा खुलासा ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणातून झाला आहे.
लंडनवासीय दातांसंबंधी सर्वाधिक चौकशी करताना दिसून आले. फुटबॉलसाठी प्रसिद्ध मँचेस्टर आणि लिव्हरपूलमधील लोकही यात मागे राहिले नाहीत. ब्रिस्टल, मँचेस्टर आणि लिव्हरपूलमध्ये याविषयावरून 19,200 लोकांनी माहिती मिळविली आहे. दातांना सुंदर करण्याप्रकरणी शेफील्डचे लोक मागे राहिले आहेत. या लोकांनी स्वतःच्या दातांना पर्ली व्हाइट म्हणजेच शुभ्र मोत्याप्रमाणे करण्याबद्दल अधिक उत्सुकता दाखविली आहे.
लंडनची हिस्सेदारी 25 टक्के
केवळ दात चमकविण्याकरता वर्षभरात ब्रिटनमध्ये 10 लाखांहून अधिक लोकांनी विचारणा केली आहे. यातील एक चतुर्थांश म्हणजेच 25 टक्के विचारणा लंडनमधून करण्यात आली आहे. बर्मिंगहॅमचे लोक दुसऱया स्थानावर राहिले. तेथील 34000 लोकांनी विचारणा केली आहे. यातील अनेक लोकांनी लाखो रुपये खर्चही केले आहेत.









