ऑनलाईन टीम / लंडन :
भारताने फटकारल्यानंतर ब्रिटनने आपल्या प्रवास निर्देश यादीत सुधारणा करत भारतात उत्पादित होणाऱ्या ‘कोविशिल्ड’ लसीला मंजुरी दिली आहे. मात्र, तरी देखील भारतातील लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर प्रश्न उपस्थित करत ब्रिटनने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
बहुतांश देशांनी कोविशिल्ड लसीला मंजुरी दिली आहे. मात्र, ब्रिटनने यापूर्वी ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे भारतात लसीचे दोन डोस घेऊन ब्रिटनमध्ये गेलेल्या नागरिकांनाही 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागत होते. दरम्यान, भारताने ब्रिटनवर दबाव वाढवताच ब्रिटनने ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता दिली आहे. मात्र, भारतातील लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ब्रिटनचा विश्वास नसल्याने त्यांनी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
नवीन गाईडलाईन्सनुसार भारतातून ब्रिटनला जाण्याच्या 14 दिवसांपूर्वी प्रवाशांनी लसीचे दोन्ही घेतलेले असतील. मात्र, तरीही त्यांना 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. ब्रिटनला भारतातील लसीबाबत अडचण नाही. तर सर्टिफिकेटवर शंका आहे, असे ब्रिटनने म्हटले आहे.