तुरुंगातील कैद्यांची केली जातेय भरती, ट्रकचालक अन् कारागिरांची मोठी उणीव
जगात असे अनेक देश आहेत, जेथे रोजगाराचा अभाव आहे. लोकांना काम मिळेनासे झाले आहे. पण ब्रिटनमध्ये कोरोना आणि ब्रेक्झिटमुळे काम करणारे लोकही मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ब्रिटिश तुरुंगातील कैद्यांची मुक्तता करून त्यांना कर्मचारी म्हणून भरती करण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये मागील काही आठवडय़ांपासून सुपरमार्केट्स रिकामी आहेत. कारण ब्रेक्झिटमुळे एचजीव्ही ड्रायव्हर, प्रूट पिकर आणि फॅक्ट्री कर्मचाऱयांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता हे संकट दूर करण्यासाठी व्यावसायिक संस्था एका योजनेच्या अंतर्गत कैद्यांना भरती करत आहेत. योजनेंतर्गत कामासाठी कैद्यांना एक दिवसासाठी मुक्त करण्यात येते.
कर्मचाऱयांच्या मोठय़ा कमतरतेमुळे येथील एक तुरुंग तर पूर्णपणे रिकामी झाला आहे. ब्रिटनमध्ये ऑक्टोबर 2020 आणि मार्च 2021 दरम्यान कैद्यांन ाएकूण 58,782 दिवसांच्या कार्यासंबंधी मुक्तता मिळाली होती. हा आकडा सातत्याने वाढण्याची अपेक्षा आहे. यानुसार कैद्यांना कामापूर्वी तुरुंगातून सोडले जाते आणि काम पूर्ण केल्यावर त्यांना तुरुंगात परतावे लागते. या कामासाठी त्यांना वेतन मिळत आहे.
कैदी पळून जाऊ नये याची जबाबदारी संबंधित संस्थेची असते. सुमारे 90 हजार एचजीव्ही ड्रायव्हर्सची कमतरता आहे. यामुळे पुरवठा साखळीवर मोठा ताण पडत आहे. याचमुळे कैद्यांना काम करण्यासाठी दिल्या मुक्ततेच्या दिवसांची संख्या आणखीन वाढू शवपे. याचबरोबर सप्टेंबरमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्यावर आणि कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर स्थिती अधिकच गंभीर होऊ शकते असे ब्रिटनच्या रिटेल कन्सोर्टियमचे म्हणणे आहे.









