पाण्यात राहणारे अनेक जीव अत्यंत धोकादायक असतात. काही प्राण्यांमध्ये माणसांचा जीव घेण्याचीही क्षमता असते. या प्राण्यांमध्ये सर्वात धोकादायक शार्क मासा मानला जातो. शार्क मासाचा वेग, टोकदार दात माणसांचा काही मिनिटांत जीव घेऊ शकतात. परंतु काही शार्क विषारी देखील असतात. असाच एक शार्क मासा ब्रिटनमध्ये आढळून येतो.
ब्रिटनच्या थेम्स नदीत शार्कची एक प्रजाती असून त्याला स्पाइनी डॉगफि किंवा स्परडॉग शार्क म्हटले जाते. शार्कचे असे नाव त्याचे डोर्सल फिन म्हणजेच वरील हिस्स्यावरील स्पाइनमुळे पडले आहे. जेव्हा कधी शार्कला धोका जाणवतो, तेव्हा तो स्वतःला चेंडूच्या आकारात बदलून घेतो आणि याच स्पाइनने हल्लेखोरावर आक्रमण करतो.
विषारी माशांच्या यादीत सामील

माशाचे तोंड अत्यंत टोकदार असते आणि डोळेही मोठे असतात. याच्या शरीराचा वरील हिस्सा करडय़ा रंगाचा असतो तर शरीरावर पांढरे चट्टे असतात. हा मासा ब्रिटनच्या विषारी माशांच्या यादीत सामील आहे. याचबरोबर स्टिंग रे आणि वीवर मासाही येथे आढळून येतो. थेम्स नदीची सफाई सुरू झाल्यापासून मागील काही वर्षांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढली आहे. तेव्हापासून नदीच्या मुखावर हा मासा प्रजन करत आहे. या माशाच्या विषामुळे माणसाला सूज आणि तीव्र वेदना होऊ शकतात.









