लंडन
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना डॉक्टरांनी पुढचे दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. सद्यस्थितीत कोठेही दौरा करू नये, अशी सूचना डॉक्टरांनी महाराणींना केली आहे. बंकिंगहॅम पॅलेसमध्ये महाराणी विश्रांती घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 95 वर्षीय महाराणी एलिझाबेथ आता हवामान बदल विषयक परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. ग्लासगो येथे ही हवामान बदल विषयक परिषद भरणार आहे. उत्तर आयर्लंडचा दौरा रद्द केल्यानंतर मागच्या आठवडय़ात त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांची एकंदर प्रकृती पाहून त्यांना अधिकाधिक विश्रांती घेण्यास सांगितले आहे. आभासी पद्धतीने बैठक घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली असून किरकोळ अन् कमी श्रमाची कामे करण्यासही त्यांना परवानगी देण्यात आली आहे. पण कोठेही अधिकृत दौरा करायचा नाही, अशी सक्त ताकीद त्यांना डॉक्टरांनी दिली आहे.









