ऑनलाईन टीम / लंडन :
महात्मा गांधींच्या चष्म्याचा ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात लिलाव करण्यात आला. इस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या या लिलावात गांधींच्या चष्म्याला 2 कोटी 55 लाख रुपये बोली लागली. अमेरिकेतील एका जिल्हाधिकाऱ्याने हा चष्मा खरेदी केला.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना 1910-30 या काळात त्यांनी हा चष्मा घातला होता. गोल आकाराचा सोन्याचा मुलामा असलेला हा चष्मा गांधींजीनी हा चष्मा एका विक्रेत्याला भेट दिला होता. त्या कुटुंबाकडे अनेक वर्षांपासून हा चष्मा होता.
या चष्म्यासाठी ऑनलाईन लिलाव आयोजित करण्यात आला होता. चष्म्याला 10 ते 15 हजार पौंड म्हणजेच 9.77 ते 14.66 लाखांची बोली लागणे अपेक्षित होते. मात्र, हा चष्मा 2 कोटी 55 लाखांना विकला गेला. चष्मा खरेदीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.