वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचा अनुभवी आणि वयस्कर टेनिसपटू अँडी मरेने रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या एटीपी चॅलेंजर्स टूरवरील 125 दर्जाच्या ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
या स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अँडी मरेने रोडीनोव्हचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या जेतेपदाबरोबरच अँडी मरेने आपल्या घरच्या मैदानावर सुरबिटॉन चषक पटकाविला. 2023 च्या टेनिस हंगामातील अँडी मरेचे एटीपी चॅलेंजर टूरवरील हे दुसरे विजेतेपद आहे. आता अँडी मरे पुढील आठवड्यात नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या एटीपी चॅलेंजर टूरवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे.









