वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजीं प्रमुख खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायलयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. सिंग यांच्या विरोधात काही महिला कुस्तीपटूंनी शारिरीक शोषण केल्याचे आरोप सादर केले आहेत. सिंग यांच्यावर अभियोग सादर करण्यात आला असून या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यांच्याविरोधात 15 जूनला आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. अजयसिंग तोमर यांच्या विरोधातही आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. सिंग यांच्याविरोधात आतापर्यंत 21 साक्षीदारांनी स्टेटमेंट दिले आहे. त्यांच्यापैकी 6 जणांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अनुच्छेद 164 अनुसार न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर स्टेटमेंट दिले आहे. या प्रकरणी वेगाने सुनावणी होईल अशी अपेक्षा तक्रारदार महिला कुस्तीपटूंनी केली आहे.









