ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमधील आतापर्यंत 91 लाख 19 हजार 477 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 22 हजार 775 जणांचा मृत्यू झाला आहे.

वर्ल्डोमीटरनुसार, शुक्रवारी येथे 58 हजार 691 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1099 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 91.19 लाख बाधितांपैकी 79 लाख 60 हजार 643 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 लाख 36 हजार 059 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत या देशात 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.









