ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. रविवारी या देशात 80 हजार 024 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1054 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज सरासरी 80 हजाराच्या पटीत रुग्णसंख्या वाढत असल्याने ब्राझीलची चिंता वाढली आहे.
वर्ल्डोमीटरनुआर, या देशात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 19 हजार 344 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 97 लाख 77 हजार 178 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 9 लाख 96 हजार 666 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 2 लाख 65 हजार 500 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.