ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये आतापर्यंत 30 लाख 13 हजार 369 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 543 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी ब्राझीलमध्ये 46 हजार 305 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 841 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 30 लाख कोरोनाबाधितांपैकी 20 लाख 94 हजार 293 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 लाख 18 हजार 533 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 32 लाख 31 हजार 548 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 51 लाख 49 हजार 723 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 65 हजार 070 जणांचा मृत्यू झाला आहे.









